कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत वित्तीय प्रणाली, वित्तीय बाजार, आर्थिक केंद्रे आणि आर्थिक संसाधने किंवा आर्थिक मूल्य ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे सक्षमतेचे किंवा विकासाचे महत्वाचे माध्यम म्हणून वित्तीय प्रणाली किंवा वित्तीय बाजार यांच्याकडे पाहिले जाते. वित्तीय प्रणाली ही विविध संस्था, बाजारपेठा, नियमने आणि कायदे, कार्यपध्दती, वित्तीय व्यवस्थापक, विश्लेषक, विनिमय, दावे आणि दायित्व यामधून तयार झालेली असते. वित्तीय प्रणालीद्वारे गुंतवणुकीस प्रोत्साहित करणारी कार्ये तसेच बचती बरोबर वित्तपुरवठ्यासाठी आवश्यक आणि सक्षम यंत्रणा उभारण्याचे कार्य केले जाते. वित्त हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मुलतः ते पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असते. यामध्ये व्यक्ती, उद्योगसंस्था आणि शासनाला आवश्यक असलेल्या निधीचा समावेश होतो. निधी गतिशील करणे आणि निधीचे वाटप करणे यासाठी देशाची वित्तीय व्यवस्था जबाबदार असते. वित्तव्यवस्था देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संपत्तीच्या निर्मितीस मदत करते. वित्ताचे वैयक्तिक वित्त, औद्योगिक वित्त आणि सार्वजनिक वित्त असे वर्गीकरण करता येते. भारताच्या वित्तीय प्रणालीत वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठ, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवांचा समावेश होतो.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours