भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यत होत गेलेला सत्तांतराचा प्रवास हा लोकशाहीतील निवडणूकांमध्ये मतदारांच्या इच्छेनुसार जनसंमतीच्या आधारे होत गेला आहे. या नेतृत्त्व साखळी परंपरेतील अटलबिहारी वाजपेयी यांचे राजकीय नेतृत्त्व हे समंजस, उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट बुद्धिमत्ता असलेले असे ‘विवेकशील नेतृत्त्व’ होते. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे भारतातील एक प्रभावशाली राजकीय नेतृत्व, दीर्घकाळ राजकारणात राहून देखील इतर राजकीय नेत्यांपेक्षा त्यांचे कार्य, व्यक्तिमत्त्व व नेतृत्व वेगळे राहिले आहे. प्रदीर्घ काळ संसद सदस्य, भारतीय जनसंघ व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेते, पंतप्रधान अशी महत्त्वपूर्ण पदे भूषविली. याचबरोबर भारतीय जनता पक्षाची स्थापना वाजपेयींच्या पुढाकाराने कशी झाली व हा राजकीय पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे अपयशातून सत्तेच्या केंद्रापर्यंत कसा पोहचला गेला याबाबतही ग्रंथात वाचकांना वाचावयास मिळणार असून एकंदरीत अटलजींनी केलेले कार्य व भूमिका आदींचे अभ्यासपूर्ण सविस्तर वर्णन या ग्रंथात करण्यात आले आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours