वा. कृ. (वामन कृष्ण) चोरघडे यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. भावासोबत उसाच्या रसाची गाडी चालवून त्यांनी उदरनिर्वाह केला. अनेकदा एक पैशाला मिळणारा मोठा लाल भोपळा शिजवून त्यावर मीठ लावून खाण्याची वेळ त्यांच्यावर आली; मात्र या सर्व संघर्षांमध्येही त्यांनी वाचनाची आवड कधीच सोडली नाही.
अवघ्या अठराव्या वर्षी त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांच्या कथा सातत्याने प्रकाशित होत राहिल्या आणि मराठी कथासाहित्यात त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले. जुनी कथा आणि नवकथा यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून वा. कृ. चोरघडे यांच्या कथांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या लेखनात मानवी मूल्ये, सामाजिक जाण आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व प्रभावीपणे व्यक्त झाले आहे.
महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभाग घेतला. पुढे नागपूर महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत राहून ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले.
त्यांच्या 'जडणघडण' या आत्मचरित्रासह 'सुषमा', 'हवन', 'यौवन', 'प्रस्थान', 'पाथेय', 'संस्कार', 'चंपाराणी', 'अबोली', 'भाग्यवती', 'ख्याल', 'ओला दिवस', 'प्रभावती' यांसारखे अनेक कथासंग्रह विशेष गाजले. १९७९ साली चंद्रपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते
Pickup available at HO
Usually ready in 24 hours